पुणे

भोर तालुक्यातील ३५ सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका

CD

भोर, ता. २ ः तालुक्यातील ७५ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटींपैकी ब वर्ग मतदानासाठी पात्र असलेल्या ३५ सोसायट्यांच्या निवडणुका जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती सहकारी संस्था विभागाचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी दिली.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या टप्यातील १९ तर फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या टप्यातील १६ सोसायटींच्या निवडणुका होणार आहेत. ७५ पैकी ६९ सोसायटी या ब वर्ग मतदानासाठी पात्र आहेत. त्यापैकी पाच वर्षे पूर्ण झालेल्या सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. सदर निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या असून पहिल्या टप्यातील निवडणुकांच्या हरकती घेण्याची तारीख ३० डिसेंबरला संपली आहे. तर दुसऱ्या टप्यातील हरकती घेण्याची मुदत ५ जानेवारीपर्यंत आहे. जानेवारी महिन्यात टापरेवाडी, वाठारहिंगे, केंजळ, भोंगवली, येवली, राजापूर, महुडे बुद्रुक, पारवडी, केळवडे, कांजळे, आळंदे, म्हाळवडी, बारे बुद्रुक, कुरुंगवडी, नाझरे, पानव्हळ, आंबवडे, कर्नावड व चिखलावडे येथील सोसायट्यांची निवडणूक होणार आहे. तर फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या टप्यात कासुर्डी गुमा, कामथडी, जांभळी, तांभाड, वडतुंबी, कारी, टिटेघर, म्हसर, चिखलगाव, वडगाव डाळ, बाजारवाडी, नाटंबी, खोपी, रांजे, वेळू व धांगवडी येथील सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा बॅंकेकडून विकास सेवा सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे गावपातळीवरील वर्चस्व सिद्ध करण्यात सेवा सोसायट्यांची निवडणूक महत्त्वाची मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT