पुणे

कांद्याचा उत्पादन खर्चही सुटेना गुनाट परिसरातील शेतकरी तोट्यात; पावणेदोन एकरामध्ये केवळ ६५ गोण्या कांदा

CD

गुनाट, ता. ४ : खतांच्या वाढलेल्या किंमती, मशागत आणि मजुरी वाढल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच सततच्या हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम कांदा पिकावर होत झाला असून उत्पादन घट झाली आहे. गुनाट (ता. शिरूर) एका शेतकऱ्याच्या पावणे दोन एकरात फक्त पासष्ट गोणी कांद्याचे उत्पादन निघाले आहे. त्यासाठी जवळपास ६० हजार रुपयांचा खर्च झाला असून उत्पन्न केवळ ४२ हजार रुपयांचे निघाले आहे.

परिसरात सध्या ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’, अशी अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळच बसत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचत चालला आहे. प्रतीक भगत यांनी गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावणे दोन एकरावर कांद्याची लागवड केली होती.
कांद्याला वेळेवर बेसल डोस दिला. तसेच आळवणी, फवारणी, खुरपणीही केल्या. मात्र, पोषक वातावरणाच्या अभावामुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे महागड्या औषधांची त्यांनी फवारणीही केली. तरीही सत्तर टक्के पीक वाया गेले. कांदा पूर्ण पोसला नसल्याने उत्पादन घट झाली. केवळ भांडवल वसूल होईल या आशाने भगत कुटुंबीयांनी कांदा काढणीस सुरुवात केली. मात्र अत्यल्प उत्पादनामुळे त्यांना तोटाच सहन करावा लागला आहे.

घटत्या उत्पादनामुळे भांडवलही वसूल होत नाही. एक पीक वाया गेले, तर मेहनत, मजुरी, भांडवलाबरोबर शेतकऱ्यांचे एक वर्ष वाया जाते. यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडते. तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी विदारक अवस्था आहे.
-प्रतीक भगत. शेतकरी, गुनाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT