पुणे

आपटीत साकारणार शिवरायांचे मंदिर

CD

भोर, ता. ४ : हिर्डोशी आपटी (ता.भोर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तालुक्यातील पहिले मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेने मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आमदार थोपटे व नामदेव महाराज किंद्रे यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. मंदिरास थोपटे यांनी १ लाख आणि भीमाजी परखंदे यांनी ५० हजार रुपयांची देणगी दिली तर सुभाष पारठे यांनी रोख रक्कमेसह पाण्याची टाकी दिली. याशिवाय पांडुरंग धोंडे, बाजीराव तुपे, पप्पू शेटे, राहुल कंक यांनीही प्रत्येकी ५ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन झाले.

यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल पारठे, इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे, कुलदीप कोडे, विठ्ठल आवाळे, रवींद्र कंक, युवराज जेधे, इंद्रजित घोरपडे, आनंदा आंबवले, अमरसिंग जाधवराव, मारुती गोळे, कुणाल मालुसरे, महेश शेटे, अप्पा मळेकर, बाळासाहेब सणस, अमित गाडे, हनुमंत कंक, करण बांदल, नारायण पारठे, लक्ष्मण पारठे आदींसह रायरेश्वर युवा प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, छावा प्रतिष्ठान व मावळा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

देणगी, शिवप्रेमींच्या सहकार्ऱ्याने उभारणार मंदिर
मंदिराचा चौथरा अष्टकोनी असून त्यासाठी सुमारे ३५ लाख खर्च अपेक्षीत आहे. यासाठीचा निधी हा आध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था, दानशूर व्यक्तींच्या देणगीतून आणि शिवप्रेमींच्या सहकार्याने उभारण्यात येणार असल्याचे मंदिराचे संकल्पक लक्ष्मण पारठे यांनी सांगितले.


32766

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

SCROLL FOR NEXT