पुणे

भोलावड्यातील उद्यानात शहीद स्तंभाचे अनावरण

CD

भोर, ता. ४ : भोलावडे (ता. भोर) येथील वन उद्यानात कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा शहीद स्तंभ उभारण्यात आला. आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते या स्तंभाचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

तालुक्यातील आपटी गावच्या वन परीक्षेत्रामध्ये ३ नोव्हेंबर २०१८ रोजी वणवा लागला होता. त्यावेळी वनकर्मचारी सदाशिव त्रिंबक नागठाणे यांचा वणवा आटोक्यात आणताना आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाच्या दिवशी वनविभागाने भोलावडे येथील बाल उद्यानात नागठाणे यांचा शहीद स्तंभ उभारला आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून अडीच लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. हा स्तंभ वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामात ऊर्जा देणारा असल्याचे मत आमदार थोपटे यांनी व्यक्त केले.

या वेळी वन उपविभागीय अधिकारी आशा भोंग, वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रेय मिसाळ, नसरापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव, वेल्ह्याचे वन परिक्षेत्र अधिकारी लंगुटे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे आदींसह वनकर्मचारी उपस्थित होते.

kik०३p१-forest
2S32767

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT