पुणे

लसीकरण शिबिराचा १५० विद्यार्थ्यांना लाभ

CD

चास, ता.६ : येथील (ता. खेड) रयत शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
चास येथील जवाहर विद्यालयात वाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चास आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तनुजा घनवट यांच्या हस्ते लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे सदस्य राजेंद्र गायकवाड, ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप ढमढेरे, सदस्य नवनाथ वाळुंज, विनायक मुळूक, ग्रामसेवक शंकर ढोरे, मुख्याध्यापक व्ही. डी. निमसे, आरोग्य विभागाचे महादेव सानप, प्रकाश पाटील, शिनलकर, आशा वर्कर लता बोकड, नीलम शिंदे, सारिका शिंदे, सुरेखा घनवट, सुवर्णा डावरे यांसह विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या सदस्याघनवट म्हणाल्या कि कोरोना लसीकरण महत्त्वाचे असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांने न घाबरता लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
--------------------------------------------------------------------------
33494

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT