Murder sakal
पुणे

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून निमोण्यात पत्नीचा खून

निमोणे (ता. शिरूर) येथे चारित्र्याच्या संशयावरून ऊसतोड कामगाराने आपल्या पत्नीचा विहिरीत ढकलून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

निमोणे (ता. शिरूर) येथे चारित्र्याच्या संशयावरून ऊसतोड कामगाराने आपल्या पत्नीचा विहिरीत ढकलून खून केला.

गुनाट - निमोणे (ता. शिरूर) येथे चारित्र्याच्या संशयावरून (Suspicion) ऊसतोड कामगाराने आपल्या पत्नीचा (Wife) विहिरीत ढकलून खून (Murder) केला. याबाबत पोलिसांनी (Police) तातडीने तपास करून चोवीस तासाच्या आतच आरोपीस गजाआड केले. याबाबात बाबासाहेब रामभाऊ धस यांनी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. सुनीता बाबासाहेब सावंत (वय ३६, रा. वंजारवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ३) निमोणे येथील बबन राजाराम काळे या स्थानिक शेतकऱ्याच्या विहिरीत महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबतची माहिती तेजराव सावंत यांनी शिरूर पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, घटना घडल्यापासून महिलेचा पती फरारी झाला होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तपासासाठी दोन पथके तयार केली. त्याचा शोध घेत असता मंगळवारी (ता. ४) निमोणे-न्हावरे रस्त्यावर आरोपीस अटक करण्यात आली. त्याने, आपणच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT