पुणे

बारामतीत कचरा गाडीला हॉर्न त्रासदायक

CD

बारामती, ता. १ : येथील नगरपरिषदेच्या जवळपास सर्वच कचरा गाड्या सध्या शहरात कचरा गोळा करताना सायरनचा आवाज असणारा हॉर्न वाजवला जातो. तो कर्कश असून, लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे हा सायरन बंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केली आहे. भार्गव पाटसकर, नीलेश वाबळे, पोपटराव सूर्यवंशी, अमोल गालिंदे, प्रवीण धनराळे, स्वप्नील मोरे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. या सायरनमुळे रुग्णवाहिका, पोलिस गाडी किंवा अग्निशामन दलाचे वाहन आहे का? असा गैरसमज लोकांच्या मनात निर्माण होत आहे. शहरी क्षेत्रात तातडीच्या प्रसंगाव्यतिरिक्त इतर वेळेस सायरन प्रतिबंधित आहे. त्यामुळे सायरनच्या वापरावर निर्बंध आणावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. दाट लोकवस्ती आणि वाढत्या वाहनांच्या संख्येने राज्यातील शहरांमध्ये ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढत आहे. वाहनांच्या भोंग्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या ध्वनीची पातळी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आणि जैवविविधतेने आच्छादीत नैसर्गिक परिसरावर विपरीत आघात करीत असून मानवी आरोग्यावर देखील याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT