पुणे

‘चंदुकाका सराफ अँड सन्स’चा ‘पायल फेस्ट’

CD

बारामती, ता. १ : चंदुकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने ‘पायल फेस्ट’चे आयोजन केले आहे, अशी माहिती चेअरमन किशोरकुमार शहा यांनी दिली.
पायलमधील डिझाइन कालांतराने विकसित झाल्या आहेत आणि त्याला प्राधान्य आहे. तरुण मुली आणि स्त्रियांच्‍या मागणी प्रमाणे पायलची डिझाईन्स देखील आता बदलली आहेत. हे लक्षात ठेवून चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांनी ‘पायल फेस्ट’मध्ये पारंपारिक व आधुनिक डिझाईन्‍स यांचा नावीन्यपूर्ण संगम साकारला आहे.
स्त्रियांच्‍या सौंदर्यालंकारात अविभाज्‍य घटक म्‍हणून पायल म्‍हणजेच पैंजणाला अनन्‍य साधारण महत्त्व आहे. भारतीय परंपरेमध्‍येही पायल ही एक शुभ वस्तू मानली गेली आहे. नववधूच्या साज श्रृंगारात पायल या दागिन्‍याला विशेष महत्त्व असून पायल घरात सकारात्मकता आणतात, असे मानले जाते. १९५ वर्षांची समृद्धशाली परंपरा असणाऱ्या चंदुकाका सराफ ॲण्ड सन्‍स प्रा. लि. यांचा पायल फेस्‍टीवल म्‍हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. ३० जानेवारीपर्यंत चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. च्‍या सर्व शाखांमध्‍ये पायल महोत्सवाचे आयोजन केले आहे.
चांदीच्या शुद्धतेनुसार दर हे चंदुकाका सराफ यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. विविध आकर्षक डिझाईन्‍स व वजनांची पायल फक्‍त ९९९ रुपयांपासून पुढे या श्रेणीमध्‍ये खरेदीसाठी उपलब्‍ध आहेत. याचबरोबर पायलच्‍या कारागिरीवर १५ टक्‍क्‍यांची सूट दिली आहे. पारंपारिक व अत्‍याधुनिक विविध शैलीतील पायल व जोडव्‍यांची विस्‍तृत श्रेणी या महोत्‍सवात सादर केली आहे.
पायल फेस्‍टबरोबरच फॅशन मोती या फॉर्मिंग ज्‍वेलरी प्रकारातील दागिन्‍यांचा महोत्‍सवही याच कालावधीत आयोजित केला आहे. यामध्‍ये मोत्‍याच्‍या दागिन्‍यांचे पारंपारिक व वेस्‍टर्न प्रकारातील असंख्‍य प्रकार सादर केले आहेत. या महोत्‍सवाअतंर्गत फॅशन मोती या फॉर्मिंग ज्‍वेलरी प्रकारातील दागिन्‍यांवर ५ ते १० टक्‍के सूट मिळणार आहे. पायल फेस्ट व मोती महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन किशोरकुमार शहा यांनी केले आहे.
दरम्यान, लवकरच चंदुकाका सराफ ॲण्ड सन्‍स प्रा. लि. यांच्‍या नगर येथील शोरूमचा प्रारंभ होत असून, नगरवासियांच्‍या सेवेत दाखल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT