पुणे

मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा ‘यशवंत ब्रिगेड’कडून इशारा

CD

बारामती, ता. ५ : आरक्षण नसल्याने धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी ‘यशवंत ब्रिगेड’ संघटनेच्याच्या वतीने धनगर समाजाचा २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा अधिक आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेशाच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लढा सुरु आहे. सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीचे (एसटी) आरक्षण दिले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, २८ फेब्रुवारीला बारामतीत धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्यांचा गांभीर्य पूर्वक विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
यशवंत ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष बापूराव सोलनकर, यशवंत छावा संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब मारकड, गणपतराव देवकाते, आनंद कोकरे, डॉ. संदीप घुगरे, संपतराव टकले, वसंतराव शेळके, चंद्रकांत वाघमोडे, पोपटराव धवडे, शंकरराव ढेबे, मल्लिकार्जुन पुजारी, सौरभ हटकर, राज पाटील, वसंत घुले आदींच्या वतीने ही मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT