पुणे

विद्या प्रतिष्ठान विद्यालयामध्ये दोन नवीन तांत्रिक विषय सुरु

CD

बारामती, ता. ५ : विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हे विषय सुरू केले असल्याची मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या शासन निर्णयानुसार या विषयांचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयास शासन मान्यता मिळाली आहे . दोन्ही विषयांसाठी लागणाऱ्या प्रात्यक्षिक लॅब विद्यालयात तयार करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे व रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे विषय सुरु केले आहेत.

दहावीनंतर डिप्लोमा, बायफोकल, आयटीआय या कोर्सला प्रवेशासाठी राखीव जागा, स्वतःचा व्यवसाय सुरु करणे, असे अनेक फायदे टेक्निकल विषयांच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात होणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी मार्गदर्शन केले. इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या प्रमुख प्रिती बोबडे व इलेक्ट्रिकल विषयाचे प्रमुख विजय वाबळे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT