पुणे

काटेवाडीत माझी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ

CD

बारामती, ता. ९ ः स्वच्छतेबाबत अग्रणी असलेल्या काटेवाडीकरांनी माझी वसुंधरा अभियानात काम करत हे अभियान यशस्वी केले पाहिजे, अशी अपेक्षा बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानाचा काटेवाडीत नुकताच प्रारंभ झाला. ग्रामस्वच्छतेबाबत ग्रामस्थांनी हिरिरीने पुढाकार घेत या अभियानाचे काम सुरु केले आहे. बारामती इंदापूर रस्त्यावरील बसस्थानकानजीकच परिसर स्वच्छ करून या अभियानास प्रारंभ करण्यात आला.
या बाबत माहिती देताना सरपंच विद्याधर काटे यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच या अभियानाची तयारी सुरु केली आहे. या अभियानाची माहिती देत ग्रामस्थांनाही या बाबत सूचना दिल्या गेल्या. १६ एप्रिल २०२१ पासून ते मार्च २०२२ पर्यंत या अभियानाचा कालावधी आहे.
यामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या विविध विषयांवर पाच हजार गुणांची गुणपत्रिका प्रत्येक ग्रामपंचायतीस दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत, शाळा, तसेच गावात सभांचे आयोजन केले गेले. यात वृक्षलागवडीसोबत टॅगिंग, नर्सरी लागवड, वृक्षलागवड रजिस्टर, वृक्ष मोजणी, प्लॅस्टिक व ओला सुका कचरा व्यवस्थापन, वायू व ध्वनी प्रदूषण कमी करणे, पाचट जाळण्यास बंदी करणे, गॅसजोड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ठिबकचा वापर, विहीर पुनर्भरण आदी मुद्यांबाबत ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे यांनी माहिती दिली.
छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच समीर मुलाणी यांच्यासह सदस्य राजू भिसे, धीरज घुले, रंजना लोखंडे, पद्मिनी देवकर, स्वाती गरडे, प्रियांका देवकाते, धनंजय काळे, अमर जगताप, जितेंद्र काटे, अमोल काटे, मारुती काटे, राजेंद्र सोलनकर, राणी ढमे, सचिन मोरे आदी उपस्थित होते.

०४२२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT