पुणे

गुनवडी येथील दारू भट्टीवर कारवाई

CD

बारामती, ता. १० : गुनवडी (ता. बारामती) येथे अवैधरीत्या चालविणाऱ्या दारू भट्टीवर बारामती शहर पोलिसांनी कारवाई केली.
शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार संजय जगदाळे यांना माहिती दिली की, विद्यानगरी-गुनवडी (ता.बारामती) येथे वास्तव्य करणारे अंबादास यशवंत चव्हाण व इतर एक जण वारंवार भट्टी लावून दारू गाळप करतात. याबाबत पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्याकडे ही माहिती गेल्यानंतर त्यांच्यावर धडक कारवाईचा निर्णय घेतला. सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे, फौजदार ढाकणे, संजय जगदाळे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे व महिला पोलिस सुनंदा माने यांनी त्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी दोनशे लिटर मापाचे दोन प्लॅस्टिक बॅरल ज्यात चारशे लिटर तयार रसायन व १५ लिटर गावठी दारू तसेच दारू गाळपासाठी ठेवलेले लोखंडी कढईत चारशे लिटर द्रावण, विषारी नवसागर, दहा किलो काळा गूळ व नशा येण्यासाठी फोडून वापरण्यासाठी फोडलेले १० बॅटरी सेल सापडले. दारू भट्टी चालविताना शरीराला अपायकारक साहित्य वापरल्याबद्दल भट्टीचालकाविरुद्ध कलम ३२८ लावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT