crime sakal
पुणे

तक्रारदार महिलेसोबतच फौजदाराने जुळविले सूत

पत्नी व फौजदार यांच्यात काहीतरी वेगळेच सुरू असल्याचा संशय आल्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली.

सकाळ वृत्तसेवा

पत्नी व फौजदार यांच्यात काहीतरी वेगळेच सुरू असल्याचा संशय आल्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली.

बारामती - कौटुंबिक वादानंतर पोलिसांकडे (Police) दाद मागण्यासाठी आलेल्या एका तक्रारदार (Complaint) महिलेशी (Women) फौजदाराने (Police Officer) संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करीत संबंधित फौजदारास सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी संबंधित महिलेच्या पतीने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. याबाबत सध्या चौकशी प्रक्रीया सुरु असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

या संदर्भात दाखल तक्रार अर्जामध्ये पतीने नमूद केले आहे की, पत्नी व नातेवाइकांमध्ये जून २०२१ मध्ये काही वाद निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास संबंधित फौजदाराकडे होता. हा वाद तडजोडीने संपुष्टात आल्यानंतर संबंधित फौजदाराने पत्नीचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावरुन संभाषण सुरू केले. पत्नीला एमपीएससी करायचे होते, त्यासाठी सगळी मदत करण्याची ग्वाही फौजदाराने दिली. पुण्यातील एका नातेवाईकाच्या घरी संबंधित महिलेच्या निवासाचीही व्यवस्था त्यांनी केली.

पत्नी व फौजदार यांच्यात काहीतरी वेगळेच सुरू असल्याचा संशय आल्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर फौजदाराने पतीला फोनवरून हातपाय तोडायची धमकी देत, त्याच्या पत्नीला आपल्या व्यवसायात दहा टक्के भागीदार करून घेणार असल्याचे सांगितले. पत्नीने हातावर संबंधित फौजदाराच्या नावाचा टॅटूही काढल्याचा आरोप तक्रार अर्जात केला आहे.

फौजदार असल्याने आपल्या जिवाला धोका असून, पोलिस या प्रकरणात आपल्याला दमदाटी करत असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, या प्रकरणात तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, चौकशी सुरू आहे, चौकशीनंतर पोलिस अधीक्षकांना याबाबतचा अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

क्लिप व्हायरल

संबंधित फौजदार तक्रारदार पतीस फोनवरून हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याची व पत्नीला दहा टक्के भागीदार करणार असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : तिरुवनंतपुरम जिल्हा क्रीडा परिषदेच्या कार्यालयात एसीचा स्फोट, २ जखमी

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT