पुणे

भिगवण ग्रामपंचायतीकडून महावितरणच्या कार्यालयाला टाळे

CD

भिगवण, ता. ७ : भिगवण ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडे असलेल्या दोन कोटी सतरा लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले.
याबाबत भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडे असलेल्या सुमारे दोन कोटी सतरा लाख रुपयांची कराची थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीस देण्यात आली होती. परंतु, याबाबत विद्युत पारेषण कंपनीकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अखेर शुक्रवारी (ता. ७) येथील भिगवण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील कार्यालयास टाळे ठोकले.
यावेळी भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी वायसे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय परदेशी, संजय देहाडे, पराग जाधव, तुषार क्षीरसागर, दत्ता धवडे, सत्यवान भोसले, जावेद शेख, गुराप्पा पवार, कपिल भाकरे, अमोल वाघ उपस्थित होते.
याबाबत सरपंच तानाजी वायसे व ग्रामसेवक दत्तात्रेय परदेशी म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडे कराची थकबाकी असून कर भरण्याबाबत विद्युत पारेषण कंपनीला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून सदर कार्यालयास टाळे लावले.
विद्युत पारेषण कंपनीचे अधिकारी हनुमंत भरणे म्हणाले, ‘‘याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ’’

bhn07p01.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT