पुणे

उद्याने उदंड मात्र सर्वांचीच दुरवस्था बारामती शहरातील बागांची परिस्थिती; नगरपालिकेचे दुर्लक्ष

CD

बारामती, ता. ९ : सुंदर व हरित बारामती अशी बारामतीची ओळख असली, तरी शहरातील अनेक उद्यानांकडे नगरपालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष असून, या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. भिगवण रस्त्यावरील पूनावाला व गूल पूनावाला तसेच अवधूतनगर सारख्या उद्यानांचा अपवाद वगळता इतर उद्यानांबाबत आनंदीआनंदच आहे. बारामतीत अधिकाधिक ठिकाणी उद्याने असावीत, आबालवृद्धांना घटकाभर विरंगुळा मिळावा, लहान मुलांना मनसोक्त खेळता यावे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक उद्यानांच्या विकासावर लक्ष दिले होते.

बारामती नगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरात लहान-मोठी मिळून ३२ उद्याने आहेत. या उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी उद्यान विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी शहरातील उद्यानांची अवस्था समाधानकारक नसल्याचे बारामतीकरांचे म्हणणे आहे.

भिगवण रस्त्यावरील पूनावाला उद्यानामध्येही दाट हिरवळ आणि चांगल्या झाडांचा अभावच आहे. स्वच्छतेबाबतही लोक फारसे समाधानी नाहीत. मात्र, पर्याय नसल्याने लोक या उद्यानांमध्ये संध्याकाळी काही क्षण व्यतित करतात. काही उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी लावली गेली खरी मात्र, लहान मुलांपेक्षा मोठ्यांनीच त्यांचा वापर केल्याने वारंवार ती तुटून जातात. दुरुस्ती होत नसल्याने काही खेळणी वापरता येत नाहीत. काही दुरुस्त करूनही पुन्हा मोडली जातात.

छोट्या ‘फुलराणी’ची बारामतीकरांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र, त्याकडेही अद्याप लक्ष दिले गेलेले नाही. कोविडच्या काळात दोन वर्षांत उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे झाडांची अवस्था आणखी खराब झाली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी दिले जाते, मात्र ज्या पद्धतीने उद्यानांकडे लक्ष द्यायला हवे, ते दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

नयनरम्य उद्यानांची अपेक्षा
बारामतीत उद्यानांची संख्या मोठी आहे. मात्र, दुर्दैवाने त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. आहे त्याच उद्यानांचे नूतनीकरण करून नवीन झाडे लावल्यास ती अधिक चांगली होतील. उद्यानांच्या विकासासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विरंगुळा म्हणून ही उद्याने अत्यावश्यक आहेत.
- अनिल पाटील, नागरिक, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT