crime sakal
पुणे

बारामतीत व्याजासाठी महिलेचा विनयभंग

सावकाराकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाच्या पैशांच्या वसूलीसाठी पत्नीचा विनयभंग व दमदाटी केल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सावकाराकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाच्या पैशांच्या वसूलीसाठी पत्नीचा विनयभंग व दमदाटी केल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बारामती - सावकाराकडून (Moneylender) घेतलेल्या रकमेच्या (Amount) व्याजाच्या पैशांच्या वसूलीसाठी (Money Recovery) पत्नीचा विनयभंग (Debauchery) व दमदाटी केल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा (Crime) दाखल केला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सीताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी (रा. बारामती) व अळनुरे (पूर्ण नाव नाही, रा. परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. यातील बोरकर व थोरात यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.

बारामतीतील एका महिलेने याबाबत फिर्याद दिली. तिच्या पतीने २०२१ मध्ये वाशीम जिल्ह्यामध्ये बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू केली होती. कंपनी सुरू करताना तिच्या पतीने या पाचजणांकडून महिना पाच टक्के व्याजाने एक कोटी नऊ लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्यांच्या कारखान्याला ३ मे २०२१ रोजी आग लागल्याने नुकसानीमुळे सावकारांची बाकीची रक्कम देण्यास त्यांना अडचण आली. सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी कुटुंबाला त्रास देण्यास प्रारंभ केला. कंपनीच्या विम्याची रक्कम मिळाल्यावर पैसे देतो असे सांगूनही त्रास सुरुच राहिला. या त्रासाला कंटाळून १७ एप्रिल रोजी या महिलेचे पती घरातून निघून गेले. ते निघून गेल्याचे माहिती असतानाही पोपट थोरात याने महिलेच्या घरात प्रवेश करत तिला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, उपनिरीक्षक घोडके पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT