पुणे

पिसुर्टी येथे अनोखे अस्थिविसर्जन

CD

वाल्हे, ता.८ : सधारणत: माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे रक्षाविसर्जन नदीमध्ये केले जाते. ही परंपरा सर्वत्र पाळली जाते. मात्र, पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील पुरंदर बौद्ध महासभेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या चुलतीच्या मृत्यूनंतर अस्थिविसर्जन शेतात करून एक अनोखा पायंडा पाडला आहे.

तनुबाई सयाजी गायकवाड (वय ९०) यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले. परिवाराच्या संमतीने तनुबाई यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतात करण्यात आला. त्यानंतर त्यांचे अस्थिविसर्जन नुकतेच झाले. तनुबाई यांचे पुतणे दादासाहेब गायकवाड, त्यांची मुले प्रदिप गायकवाड, तुकाराम गायकवाड व मुली गंधारी काकडे, लता महानवर, वंदना जगताप व चंदा कदम यांच्या संमतीने अस्थिविसर्जनामुळे त्यांच्या शेतात करण्यात आले. तनुबाई यांच्या स्मरणार्थ त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जलप्रदूषण टाळण्यासाठी व जुनाट विचारांना फाटा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिवाराच्यातीने सांगण्यात आले.
या वेळी माणिकराव चोरमले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Val08p5
S34166

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT