पुणे

रोटरी क्लबची सुरक्षा रक्षकांना मायेची ऊब

CD

भिगवण, ता. ९ : येथील (ता. इंदापूर) रोटरी क्लब ऑफ भिगवन व रोटरी क्लब पुणे रिव्हरसाईड यांचे संयुक्त विद्यमाने भिगवण व परिसरामध्ये थंडीमध्ये कुडकुडत पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. मायेची ऊस मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी समाधान व्यक्त केले.
काही दिवसांमध्ये चोरीच्या प्रमाणांमध्ये वाढ झाल्यामुळे विविध ठिकाणी काम करत असलेले सुरक्षा रक्षक थंडीमध्ये कुडकुडत पहारा देत आहेत. ही बाब येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या लक्षात आली. त्यानंतर येथील रोटरी क्लब ऑफ भिगवण व रोटरी क्लब ऑफ पुणे रिव्हरसाईड यांचे संयुक्त विद्यमाने या सर्व सुरक्षा रक्षकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे, सचिव सुषमा वाघ, माजी अध्यक्ष सचिन बोगावत, संपत बंडगर, प्रदीप वाकसे, संजय रायसोनी, डॉ. अमोल खानावरे, औदुंबर हुलगे, तुषार क्षीरसागर, नामदेव कुदळे, किरण रायसोनी उपस्थित होते.
रियाज शेख यांनी सूत्रसंचालन केले तर सुषमा वाघ यांनी आभार मानले. ब्लॅंकेट वाटपासाठी रोटरी क्लबच्या संचालक पल्लवी साबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

सुरक्षारक्षक रात्रभर जागून आपल्या सर्वांची सुरक्षेची काळजी घेतात. सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे ते थंडीपासून बचाव करण्यासाठी टायर किंवा लाकूड जाळून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तो पुरेसा नाही. त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या हेतून रोटरी क्लबने सर्व सुरक्षा रक्षकांना ब्लॅंकेटचे वाटप केले.
- संजय खाडे, अध्यक्ष, रोटरी क्लब

.............................................
34239

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT