पुणे

बबनराव तळेकर अध्यक्षपदी

CD

चास, ता. ९ : पांगरी बुट्टेवाडी (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव मारुती तळेकर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब पोळ यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये सर्व उमेदवार व ग्रामस्थ यांनी विचार विनिमय करून अध्यक्षपदी तळेकर तर उपाध्यक्षपदी पोळ यांची बिनविरोध निवड केली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळातील सदस्य वासुदेव घोलप, दत्तात्रेय खांडगे, गोविंद बुट्टे, विठ्ठल तळेकर, बबन गाढवे, कुंडलिक तळेकर, बन्सीलाल खांडगे, सखुबाई बुटे, जयश्री भालेराव, पार्वताबाई तळेकर आदी उपस्थित होते. ही निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी उद्योजक गणेश शितोळे, शत्रुघ्न खांडगे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घोलप, अमोल गाढवे, ॲड. संतोष तळेकर, ॲड. प्रकाश तळेकर, गणपत गाढवे, भगवान गाढवे, महेंद्र गाढवे आदींनी विशेष प्रयत्न केले. निवडणूक पार पडल्यावर ग्रामस्थांनी भंडारा उधळून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT