पुणे

बंदी असूनही भरला भोरचा बाजार

CD

भोर, ता. ११ ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरपालिका प्रशासनाने मंगळवारचा आठवडे बाजार बंद ठेवला. परंतु, नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे बाजार नेहमीसारखाच भरला गेला. बाजारात विक्रेते कमी आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात आल्याने भाज्यांसहीत सर्वच वस्तूंचे भाव वाढले गेले. त्यामुळे ग्राहकांना नेहमीपेक्षा जास्त भावाने भाज्या खरेदी कराव्या लागल्या.
नगरपालिका प्रशासनाने मंगळवारचा (ता. ११) आठवडे बाजार बंद करण्याचे सोमवारी (ता. १०) दुपारी जाहीर केले. त्यामुळे बाहेरील विक्रेते व ग्राहक यांना याची पूर्ण कल्पना आली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते बाजारात आले. सकाळी नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी रिक्षामधून दंवडी देवून गेले. परंतु, त्यानंतर मात्र नगरपालिकेचा आणि पोलिसांचा एकही कर्मचारी बाजारात फिरकला नाही. आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्यामुळे अनेक महिला ग्राहक खरेदी करण्यासाठी बाजारात आल्या. बाजारात ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे विक्रेत्यांनी एका किलोच्या प्रत्येक भाजीमागे १० ते ५० रुपयांनी वाढ केली. तरीही ग्राहकांनी मिळेल त्या दरात भाज्या खरेदी केल्या. दुपारी बारा वाजल्यानंतर ग्राहकांच्या संख्येत झालेली वाढ सायंकाळपर्यंत होती.

kik११p२-bajar,kik११p२-bajar१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT