पुणे

मोहकलात सतरा लाभार्थींना घरकुल मंजुरीचे पत्र

CD

चास, ता. १४ : मोहकल (ता. खेड) येथील सुमारे अठरा लाभार्थींना महाआवास अभियानांतर्गत घरकुले मंजूर झाली असून लाभार्थींच्या खात्यात प्रथम अनुदानही प्राप्त झाले आहे. या अठरा लाभार्थींना मंजुरीचे पत्र पंचायत समिती खेडचे सभापती अरुण चौधरी तसेच जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
मोहकल येथील १४ कुटुंबांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन घरकुले मंजूर झाली असून या लाभार्थींच्या घरांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. या मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थींना कार्यक्रमात मंजुरीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, विस्तार अधिकारी अनिता ससाणे, सरपंच सुनीता भागवत, उपसरपंच नवनाथ राऊत, ग्रामपंचायत सदस्य मंदा थोरात, दत्तात्रेय राऊत, शशिकला रणपिसे, नितीन राऊत, माजी सरपंच गुलाब राऊत, ग्रामसेवक प्रियांका वाव्हळ, शिवमंगल आंबेकर यांसह ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी विजय पारधी, पोपट खंडवे, विठ्ठल गावडे, किसन गावडे, उद्धव पारधी, चिंधू खंडवे, जिजाबाई खंडवे, विठ्ठल खंडवे, सुमन पारधी, चांगुणाबाई गावडे, नामदेव गावडे, संतोष खंडवे, साहेबराव खंडवे, जनाबाई खंडवे, मुऱ्हाबाई खंडवे, सीताबाई खंडवे व कचराबाई खंडवे यांना मंजुरीची पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT