पुणे

गटतटामुळे गावांचा विकास खुंटतो : घनवट

CD

चास, ता. १५ : पक्षीय राजकारणामुळे गावागावात गटतट तयार होतात. मात्र, निवडणुका संपताच गावातील नागरिकांनी गटतट विसरून एकत्र येण्याची गरज आहे. कारण या राजकारणामुळेच गावांचा विकास खुंटतो असे मत वाडा-कडूस गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी मोहकल (ता. खेड) येथे भूमीपूजन व उद्‍घाटन कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
मोहकल गाव गेली अनेक वर्षांपासून विकासकामांपासून वंच्छित राहिलेले गांव, मात्र या गावात विकासकामांचा सपाटा लावून अत्यंत कमी कालावधीत जास्तीतजास्त अडचणी सोडविण्याचे काम सद्य:स्थितीत वाडा-कडुस गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या माध्यमातून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (ता. १३) गावामध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्‍घाटन करण्यात आले, यामध्ये मुक्ताई मंदिरासमोर सभामंडप बांधणे, कानिफनाथ वस्ती कॅनॅाल ते मिंडे यांच्यापर्यंत रस्ता करणे व हायमॅक्स दिवा बसवणे या कामांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे सदस्य राजेंद्र गायकवाड, गावच्या सरपंच सुनीता भागवत, उपसरपंच नवनाथ राऊत, हेमंत वीरकर, दिंडीमालक महादेव रणपिसे, सुशीला रणपिसे, नितीन राऊत, संतोष राऊत, माधव रणपिसे, आदिनाथ रणपिसे, बाळू राऊत, अशोक राऊत, विनायक राऊत, बाळशिराम राऊत, कमानचे सरपंच योगेश नाईकरे, बबुसा घनवट उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोरोनाकाळात फ्रंट वर्कर म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये अनिता राऊत, वर्षा दौंडकर, मनिषा रणपिसे, शिल्पा राऊत, योगेश राऊत, सुखदेव रणपिसे व ग्रामसेविका प्रियांका वाव्हळ यांना शाल- श्रीफळ, मेडल देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुदाम कराळे यांनी केले तर आभार किरण थोरात यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT