पुणे

मरकळला दाम्पत्याचे धरणे

CD

चाकण, ता.३१ : मरकळ (ता.खेड) गावच्या हद्दीतील मोक्याच्या जमिनीवर तसेच त्या जागेतील कंपनीवर महसूल, पोलिस, भूमिअभिलेखचे कर्मचारी यांना हाताशी धरून एकाने कंपाउंड मारून जमिनीवर कब्जा केला आहे तसेच बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे.
याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, पोलिस कर्मचारी, भुकरमापक, मंडलाधिकारी, तलाठी आदींवर कारवाई व्हावी व जमीन आमच्या ताब्यात मिळावी या मागणीसाठी कंपनीचे मालक, शेतकरी रमेश गोडसे व त्यांच्या पत्नी आशा गोडसे यांनी मरकळ येथे गेल्या अडीच महिन्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


प्रशासनाकडून चुकीची भूमिका
रमेश गोडसे यांनी सांगितले की, महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाने रवी लांडगे व त्यांच्या साथीदारांना आमच्या मालकीच्या जमिनीत बेकायदेशीर कब्जा करण्यास मदत केली. कंपनीतील मशिनरी चोरून नेली. संबंधितांनी त्यांची जमीन सोडून आमच्या मालकीच्या जमिनीत बेकायदेशीररीत्या कब्जा केला आहे. आळंदी पोलिस ठाण्याच्या पोलिसांना नावे सांगूनही पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल न करता अज्ञातांवर गुन्हे दाखल केले आहेत. संबंधितांनी आमच्या जमिनीवर कब्जा करताना काही लोकांचा जमाव आणून आम्हाला शिवीगाळ, मारहाण केली. तसेच प्रशासनाने चुकीची भूमिका घेऊन आमच्यावर अन्याय केला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.

03232

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भाजप नेत्यावर झाडल्या तीन गोळ्या, जागीच मृत्यू; घराबाहेर उभा असताना हल्लेखोर आले अन्...

Sangli Raisins : जानेवारीऐवजी फेब्रुवारीत बेदाणा हंगाम; शेतकरी आणि शेडमालकांची चिंता वाढली

Sangli Municipal : लहान भूखंडधारकांना दिलासा! बांधकाम परवान्याचे अधिकार थेट नगररचना विभागाकडे

Pumpkin Seeds Before Bed: रात्री झोप येत नाही? झोपण्यापूर्वी भोपळ्याच्या बिया खाल्ल्यावर काय होतं, आहारतज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Mumbai Local: नववर्षाच्या जल्लोषासाठी मुंबई लोकल सज्ज! मध्यरात्री धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT