पुणे

मळूदेवीच्या यात्रोत्सवात काल्याच्या कीर्तनाने रंगत

CD

चास, ता. १५ ः वाळद (ता. खेड) येथे ग्रामदैवत श्री मळूदेवीचा यात्रा उत्सव उत्साहात पार पडला. विविध कार्यक्रमाच्या रेलचेलीत काल्याच्या कीर्तनाने उत्सवात रंगत आणली.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने सालाबादप्रमाणे साजरा झालेल्या या उत्सवात सकाळी ग्रामस्थांच्या सहभागाने देवीला पारंपारिक वाद्यांच्या गजरात हारतुरे अर्पण केल्यावर देवीची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. देवीच्या उत्सवानिमित्त मंदिरासमोर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा अखेरचा व काल्याचा दिवस असल्याने काल्याचे कीर्तन अर्जुन महाराज शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून पार पडल्यावर यात्रा उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सुमारे दोन दिवस चाललेल्या या उत्सवास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अतुल देशमुख यांचा समावेश होता.
यात्रेचे संपूर्ण नियोजन ग्रामस्थ, यात्रा कमिटी वाळद, ग्रामपंचायत वाळद, मळूदेवी ट्रस्ट, ट्रस्टचे अध्यक्ष भगवान पोखरकर, सरपंच श्याम कोरडे, मनोहर पोखरकर, भरत पोखरकर, बाळासाहेब भवारी, ग्रामपंचायत सदस्य मंदा पोखरकर, लक्ष्मीताई पोखरकर, रामदास पोखरकर, अंबर सावंत, डी. आर. पोखरकर, रोहिदास पोखरकर, अशोक पोखरकर, जालिंदर पोखरकर, गहिणीनाथ पोखरकर, राम शिंदे, विश्र्वनाथ वाळुंज, पोलिस पाटील कांताबाई पोखरकर यांनी केले.

43343

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT