पुणे

पर्यटनाच्या माध्यमातून कुंभारगांवला रोजगाराच्या संधी : पाटील

CD

भिगवण, ता. २६ : उजनी जलाशयावर येणारे स्थलांतरित पक्षी हे देशी विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. इंदापूर तालुक्यातील कुंभारगांवला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य व स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा भाग पर्यटकांचा आवडता बनला आहे. स्थानिक युवकांनी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल्यास पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील असे मत माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व जिजाऊ फेडरेशनाच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी नुकतीच भेट देऊन पक्षी निरीक्षण केले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वणवे, संपत बंडगर, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, विश्वास देवकाते, माजी उपसभापती संजय देहाडे, उपसरपंच स्वाती भोईटे उपस्थित होते.
पाटील यांनी कुंभारगांव येथे नौकाविहार करून या भागातील फ्लेमिंगो, चित्रबलाक, पाणघर, सीगल, पाण कोंबडया आदी विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निरीक्षण केले. पक्षी निरीक्षणानंतर पाटील म्हणाले, हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो पक्षी भारतांमध्ये कुंभारगाव येथे येतात. देखणा असलेला फ्लेमिंगो व इतर पक्षी पाहण्यासाठी पर्यटकही इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, तक्रारवाडी डिकसळ येथे येत असताना स्थानिकांनी या बाबीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांना सुविधा व युवकांना रोजगार याचा योग्य समतोल साधल्यास इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव, तक्रारवाडी डिकसळ हा परिसर पर्यटकांची पहिली पसंती बनेल. यावेळी उदय भोईटे, भगवान लोंढे, स्वप्नील लोंढे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

छायाचित्र क्र.BHN26P02.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Kolhapur District Bank Election : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, भय्या माने यांच्यासह दिग्गजांना धक्का; सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना सर्कीट बेंचचा दणका

Sindhudurg Farmer Compensation : e-KYC अपूर्ण असल्यास 4 कोटी 41 लाखांची नुकसानभरपाई अडकणार; सिंधुदुर्गातील 'या' 2,212 शेतकऱ्यांना मोठा फटका

Maharashtra Live News : भाजपने निवडणूक आयोगाला ओलीस ठेवले आहे – इम्रान मसूद

IPL 2027 Trade : एक मोठा खेळाडू Mumbai Indians च्या ताफ्यात येतोय? भविष्याचा कर्णधार म्हणून सक्षम पर्याय; आश्चर्यचकित करणारी Deal

SCROLL FOR NEXT