पुणे

मांढरदेवीची यात्रा रद्द

CD

भोर, ता. ९ ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथील श्री काळूबाई देवीची (मांढरदेवीची) यात्रा रद्द करण्यात आली आहे. वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यात्रेच्या कालावधीत केवळ मंदिराचे पुजारी आणि देवस्थान ट्रस्टचे सदस्य देवीचे धार्मिक विधी पार पाडणार आहेत.
सोमवारी १० जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत मांढरदेवीच्या मंदिराच्या आणि सभोवतालच्या १० किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरात तंबू, पाल यासारखे आडोसा असलेल्या गोष्टी उभारण्यात येणार नाहीत आणि पशुहत्याही करण्यात येणार नाही. मांढरदेव परिसरातील परखंदी, डूईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, शहाबाग, अंबाडे खिंड, बोपर्डी, धावडी, धावडी फाटा, रेणूसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळूबाई मंदिर जमदाडे वस्ती व सुरूर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवडी, अतीत व लिंबाचीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. याशिवाय भाविकांना भोर बाजूकडून मांढरदेवीच्या दर्शनाला देखील जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी मांढरदेवीच्या दर्शनाला येऊ नये, असे आवाहन भोर तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT