पुणे

आडाचीवाडी, दौंडज येथे विद्यार्थ्यांची मिरवणूक

CD

वाल्हे, ता. २४ : पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी, दौंडज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. तर इयत्ता पहिलीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची आडाचीवाडी येथे सजविलेल्या बैलगाडीतून तर दौंडज येथे फेटे बांधून चारचाकीतून मिरवणूक काढण्यात आली.
आडाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. शाळेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार व लोकनियुक्त सरपंच दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के, अलका पवार, मंदाकिनी पवार, अविनाश चव्हाण, विनय पवार, प्रकाश पवार, रोहिणी पवार, मोनाली पवार, उज्ज्वला पवार, सुवर्णा पवार, मालती गायकवाड उपस्थित होत्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षिका तृप्ती पवार यांनी आभार मानले.
दौंडज (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाली. पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची फेटे बांधून चारचाकीतून ढोल-ताशा लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा म्हेत्रे यांनी दिली.
मेळाव्याचे उद्‍घाटन नवागत विद्यार्थ्यांवर केंद्रप्रमुख सुरेश लांघी व सरपंच सीमा भुजबळ यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम फाळके, पर्यवेक्षिका अनिता भुजबळ आदी उपस्थित होते. येथील मधुकर इंदलकर यांनी मिरवणुकीसाठी गाडी उपलब्ध करून दिली. नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, पालक मार्गदर्शन आदि उपक्रमांद्वारे मेळावा पार पडला.
सहशिक्षिका रूपाली पिसाळ, जयश्री पवार, नयन शिर्के आदींनी संयोजन केले.
59191

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT