पुणे

भोरमधील २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

CD

भोर, ता. ४ : तालुक्यातील २५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील २३ आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे (केळकर) यांनी दिली.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस तालुक्यातील २७४ प्राथमिक शाळांमधून १ हजार ८८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले असून, २३ विद्यार्थी शिषवृत्तीधारक झाले आहेत. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस तालुक्यातील ४८ शाळांमधून ३१६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले असून २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये पुढील तीन वर्षांकरीता शिष्यवृत्ती मिळणार आहे.
पंचायत समितीचे सभापती लहू शेलार, उपसभापती रोहन बाठे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेदांत शंकर राऊत यास सर्वाधिक ८४.६७ टक्के गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल वैष्णवी वसंत कंक हीस ८२.६७ तर प्रथमेश संपत रांजणे यास ८२ टक्के गुण मिळाले. इतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे कंसात गुणांची टक्केवारी - पृथ्वीराज रघुनाथ तुपे(८०.६७), अंजली विजय सावले (७९.३३), शरण्या सचिन सुतार (७८), श्रेयस संपत कंक (७७.३३), तुषार राजू कंक(७७.३३), शेजल किसन दिघे(७६), सुप्रिया शरद पवार (७५.३३), साईराज कोंडिबा घोलप(७४.६७), सानिका विठ्ठल ढवळे (७४), कावेरी केशव कंक (७४), आकांक्षा लहू पवार (७३.३३), यश अंकुश कंक (७३.३३), चांदणी सुरेश ढवळे(७३.३३), क्रांती गोरखनाथ जाधव(७३.३३), समर्थ तुकाराम कदम(७२), ओंकार धोंडीबा आखाडे(७२), शीतल लहू पिलाणे (७२), रेणुका गणपत डोईफोडे (७१.३३), समृद्धी शांताराम किंद्रे (७१.३३), पल्लवी भिवराम पोळ (७०.६७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT