पुणे

म्हाळुंगे इंगळे पोलिस ठाण्यात महिला कक्ष

CD

आंबेठाण, ता. २४ : पोलिस खाते आणि खासगी संस्था यांच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांनी आता कामात जास्त गुणवत्ता दाखवावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी म्हाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे पोलिस कर्मचाऱ्यांना केले.
महिला कर्मचाऱ्यांना पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असणाऱ्या महिला कक्ष आणि मुद्देमाल कक्ष या नवीन वास्तूच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ एनआयबीएम आणि नेक्स्टईअर कंपनी यांच्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी चौबे म्हणाले, ‘‘प्रत्येक क्षेत्रात आणि पोलिस दलात देखील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या वाढत आहे. आज उपलब्ध केलेल्या मूलभूत सुविधा ही कौतुकास्पद बाब आहे.’’
अनिल वाळिंबे म्हणाले, ‘‘आमचा हा १२वा प्रकल्प आहे. यात महिलांसाठी वॉश रूम, लॉकर, आराम कक्ष, चेंजिंग रूम, महिला कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.’’
यावेळी मनीष भसनाळे, ज्ञानेश्वर साबळे, मनीषा भंडरवाड यांनी विचार व्यक्त केले. या प्रसंगी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, मनीष भसनाळे, विवेक पाटील, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, किशोर पाटील, दत्तात्रेय जाधव, म्हाळुंगेच्या सरपंच मंगल भोसले, पोलिस पाटील संघटनेच्या तृप्ती मांडेकर, अर्चना म्हाळुंगकर, रत्ना पिंगळे-देशमुख यांच्यासह विविध गावचे पोलिस पाटील, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. अजित वाळिंबे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT