पुणे

राजूबाई वस्तीवर गरजूंना कपडे वाटप

CD

आंबेठाण, ता. ३ : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील राजूबाई वस्ती या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वस्तीवर राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून गरजूंना कपड्यांचे मोफत वाटप केले. मागील दोन महिन्यात जमा झालेल्या जवळपास २५ पोती कपड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.
राजगुरुनगर येथे लहानांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत जुने परंतु वापरण्यायोग्य असलेले कपडे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोळा करण्यात येतात. त्या कपड्यांची लहान मुले, स्री, पुरुष अशी आणि वयाप्रमाणे विभागणी केली जाते. त्यानंतर ते कपडे जिथे गरज असेल तेथे गरजू लोकांना वाटले जातात. गेल्या दोन महिन्यात जमा झालेले कपडे गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, सामाजिक कार्यकर्ते हिरामण पडवळ, पंढरीनाथ पडवळ, बाबाजी कातोरे, ओंकार दुधाळे, सविता लोंढे, दिलीप राक्षे, कोरेगाव खुर्द ग्रामपंचायत सदस्या जिजाबाई मेंगळे, रंगनाथ मेंगळे, वसंत मेंगळे, दादाभाऊ मेंगळे यांनी कपडे वाटप करण्यासाठीचे नियोजन पार पाडले. ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य होनाजी मेंगळे यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एफ-२ वाघिणीचा ‘फॅमिली टाइम’; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT