आंबेठाण, ता. १३ : कोरेगाव खुर्द ते किवळे (ता. खेड) या प्रमुख जिल्हा मार्गाचे सुरू असणारे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. रस्ता उखडून ठेऊन अर्धवट खडी पसरून ठेवली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीएमारडीए प्रशासनाने तातडीने या कामाकडे लक्ष द्यावे आणि काम उत्तम प्रकारे कसे होईल, याबाबत संबंधितांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी केली आहे.
मागील सहा महिन्यांपासून हे काम सुरू असून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या कामाचा दर्जादेखील अतिशय निकृष्ट आहे. या मार्गाचा मोठा उपयोग हा शेतकरी, कामगार यांना होत असतो. परंतु अर्धवट आणि संथ गतीने काम सुरू असल्याने लहानमोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. कोरेगाव ते किवळे हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ असून एमआयडीसी भागात रोजीरोटीसाठी येणाऱ्या कामगारवर्गाचे प्रमाण यात मोठे आहे. याशिवाय भामा नदीच्या दोन्ही बाजूला बागायती शेती केली जात असल्याने चाकण, राजगुरुनगर, पिंपरी चिंचवड आदी भागात शेतमाल वाहतूक केला जातो. तीर्थक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे.
अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार काम सुरू नाही. या कामाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची पाहणी करावी आणि रस्त्याचे काम उत्तम प्रकारे कसे केले जाईल, याबाबत योग्य त्या सूचना कराव्या असेही बुट्टेपाटील म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.