आंबेठाण, ता. १० : म्हाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर येथे होत असलेल्या संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिराच्या निर्मितीसाठी एक लाख रुपये देणगी देण्यात आली.
याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त जोपाशेठ पवार, समाजभूषण संदीप बोत्रे पाटील, संदीप पवार यांच्यासह भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळके, भाजप युवा मोर्चाचे रूपेश वाळके आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्यावतीने यावेळी संस्थापक अध्यक्ष उज्ज्वला दिलीपराव वाळके, उपाध्यक्ष उषा मेमाणे, सचिव मुक्ताबाई भोपे, संचालक रूपाली गायकवाड, मंदा इंगवले, विमल म्हाळुंगकर, शोभा भांगरे, कमल शिवळे, हौसाबाई तुपे, कृतिका वाळके, व्यवस्थापक वैशाली दिनकर गटे आदी उपस्थित होते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रति असणारा निष्ठावंत श्रद्धाभाव या देणगीच्या रूपाने निश्चित जाणवतो असे गौरवोद्गार विश्वस्त जोपाशेठ पवार यांनी संस्थेप्रती व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.