पुणे

`सामाजिक बांधिलकी जपत राजगुरुनगर बँकेचे काम पारदर्शक सुरू’

CD

आंबेठाण, ता. १० : ‘‘आजवर हजारो सभासदांना उभे करण्याचे काम राजगुरुनगर बँकेने केले आहे.सहकार नेहमी विश्वासावर चालतो आणि तो विश्वास बँकेने जपला आहे.नफ्याबरोबर बँकेने सामाजिक बांधिलकी जपली असून बँकेचे काम पारदर्शकपणे सुरू आहे,’’ असे गौरवोद्‍गार केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
वासुली फाटा, भांबोली (ता. खेड) येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सुरू होत असलेल्या १८व्या शाखेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार बाबाजी काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष किरण आहेर, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, मंदार कुलकर्णी, वासुलीच्या सरपंच कोमल पाचपुते, भांबोलीच्या सरपंच शीतल पिंजण, उपसभापती क्रांती सोमवंशी, अशोक उमरगेकर, संजय घुंडरे, शिवाजी मांदळे, गणेश बोत्रे यांच्यासह सर्व संचालक आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
ओसवाल म्हणाले की, गेल्या दोन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या काळात सुमारे ७०० कोटीचा व्यवसाय आणि एकूण २९०० कोटी व्यवसाय पूर्ण केला आहे. नागरी सहकारी बँकांच्या व्यथा मोहोळ यांनी शासनदरबारी मांडाव्यात, अशी मागणी केली. एनपीए सलग दुसऱ्या वर्षी शून्य टक्के ठेवण्यात यश मिळाले आहे.
सूत्रसंचालन बाळासाहेब घाटे आणि योगिता पाचारणे यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी आभार मानले.


बँकेची वैशिष्ट्ये :
* या आर्थिक वर्षापासून सभासदांचा चार लाखांचा अपघाती विमा.
* बँकेच्या आजपर्यंत १८ शाखा असून ३९ हजार सभासद.
* भागभांडवल ५२ कोटी रुपये,स्वनिधी २६६ कोटी रुपये तर गुंतवणूक ८८१ कोटी आहे.

‘तुकोबा’ आवर्त ठेव योजना सुरू
भांबोली शाखेच्या उद्‍घाटनाचे औचित्य साधून राजगुरुनगर बँकेने सभासदांना २०२३-२०२४ सालचा ९ टक्के लाभांश जाहीर केला आणि वाटपासही सुरुवात केली‌. तसेच या शाखेच्या आरंभानिमित्त ‘तुकोबा’ आवर्त ठेव योजना सुरू केली. या योजनेचा लाभ बँकेच्या सर्व शाखांमधून ग्राहक घेऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT