आंबेठाण, ता. २५ : तळशेत ते शिरोली- पाईट रस्ता (ता. खेड) या मार्गाचे पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. परंतु करंजविहिरेच्या तळशेत भागात मुख्य रस्त्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना गटारातून प्रवास केल्याचा अनुभव येत आहे. नागरिकांच्या आडमुठेपणामुळे रस्त्याच्या कडेला साचलेले पावसाचे पाणी निघून जात नाही. त्यामुळे रस्त्यावर तळे साचले आहे. याचे दुष्परिणाम प्रवासी, नागरिकांना भोगावे लागत आहे.
तळशेत फाट्यावर पाईट भागाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. जवळपास सहा किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून, त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. तळशेत फाट्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांनी व्यापारी गाळे उभारले असून, त्यासाठी दुतर्फा भराव केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी उंचवटा आणि मध्ये खोलगट भाग अशी अवस्था झाल्याने पावसाचे पाणी जायला मार्ग राहिला नाही. गटारे पूर्णपणे बुजवली आहेत. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून, नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. सध्या या मार्गाच्या दुरुस्तीचे सुरू असणारे काम अवघ्या काही दिवसांत उखडले आहे.
पुणे, मुंबई, सातारा, सांगली यासह देशाच्या दक्षिण भागातून येणारे नागरिक भीमाशंकरला जाण्यासाठी याच मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. याशिवाय भामनेर खोऱ्यात प्रवेश करण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु तोंडावरच अशी दुरवस्था असल्याने प्रवासी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आमच्या विभागामार्फत ही रस्ता दुरुस्ती सुरू असून, केवळ नागरिकांच्या चुकीच्या धोरणामुळे प्रवाशांना याचा फटका बसत आहे. नागरिकांनी सहकार्य केले, तर आम्ही तत्काळ हे काम मार्गी लावू असे पीएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.