पुणे

संदेश काळे यांना ‘स्टार्टअप मेंटर ॲाफ द इयर’ पुरस्कार

CD

आंबेठाण, ता. २ : वराळे (ता. खेड) येथील तरुण उद्योजक संदेश बापूसाहेब काळे यांना त्यांच्या व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘स्टार्टअप मेंटर ॲाफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित केला.
पुणे येथे नवभारत ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १८ तरुण उद्योजकांचा यावेळी सन्मान केला. उद्योग, शिक्षण, क्रीडा, रिअल इस्टेट, व्यापार, औद्योगिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील नवउद्योजकांनी कमी वयात मिळविलेले यश, गुन्हेगारी व्यतिरिक्त यश, शासनाला दिलेला महसूल याची पडताळणी करून हा सन्मान केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नवभारत ग्रुपचे निमिष माहेश्वरी डॉ. आर्शी आयुब, घोडावत समूहाचे संजय घोडावत, महाराष्ट्रात चेंबर्स ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललित गांधी, विशाल चोरडिया, सीमा सिंह आदी उपस्थित होते.
काळे यांच्या श्रीशा लॅंडमार्क आणि श्रीशा क्रेन सर्विस या उद्योगाला ‘स्टार्टअप मेंटर ॲाफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. खेड तालुक्यातील ते एकमेव उद्योजक या पुरस्कारास पात्र ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT