पुणे

विज्ञान प्रदर्शनात वेदांतीचे यश

CD

आंबेठाण, ता. ४ : शहापूर (जि. भंडारा) येथे गुरुवार (ता. २७ नोव्हेंबर) ते शनिवार (ता. २९ नोव्हेंबर) या कालावधीत राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड मानक विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात भांबोली (ता. खेड) येथील भामचंद्र विद्यालयातील वेदांती वाबळे हिच्या ‘मॉडर्न सेफ्टी डोअर’ या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
दरम्यान, २०२४- २५ मधील निवड झालेल्या २१ प्रकल्पांपैकी ५ प्रकल्प हे पुणे जिल्ह्यातील असून हा एकमेव प्रकल्पाची खेड तालुक्यातून निवड झाली आहे. तर सेफ्टी डोअर व सेफ्टी बेल्ट या दोन्ही प्रकल्पांची निवड राज्यस्तरावर जिल्ह्यातून या विद्यालयाच्या दोन्ही प्रकल्पांची निवड झाली. त्यातील सेफ्टी डोअर याची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.
या विद्यार्थिनींना प्रतिमा घनवट व रोहिणी साबळे आणि विज्ञान शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजित बुट्टेपाटील, सचिव विलास काळे, उपाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, विनोद पाचपुते, शिक्षण समिती अध्यक्ष निशांत करंडे, प्राचार्य संजय बोरकर आदींनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांची कामगिरी
विद्यालयातील १४३ विद्यार्थ्यांनी २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात सहभाग घेतला होता, तर त्यातील १४ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे.
तर २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात २११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यातील २१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT