आंबेठाण, ता. ६ : कोरेगाव बुद्रुक (ता. खेड) येथील पहिल्या महिला सरपंच कविता गोगावले (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, दोन दीर, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. कोरेगाव बुद्रुक विकास सहकारी कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष व शेतकरी रोहिदास गोगावले हे त्यांचे पती होत.