आंबेठाण, ता. १२ : आंबेठाण (ता. खेड) येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्या फुलाबाई आनंदराव घाटे (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, दीर, पुतणे असा मोठा परिवार आहे. आंबेठाण यात्रा कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घाटे हे त्यांचे पुत्र, तर आंबेठाण सोसायटीचे माजी अध्यक्ष बबन घाटे हे त्यांचे दीर होत.