पुणे

शेलू, कोरेगावातील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

CD

आंबेठाण, ता. १३ : भामा नदीवरील (ता. खेड) दोन पूल जीर्ण झाल्याने त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. खेड तालुक्यातील भामा नदीवरील शेलू ते कुरकुंडी आणि कोरेगाव खुर्द ते कोरेगाव बुद्रुक या गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या आणि सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून विभागाचा हा निर्णय जरी योग्य असला तरी यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मात्र मोठा वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागणार आहे. कोरेगाव खुर्द आणि कोरेगाव बुद्रुक या दोन गावादरम्यान भामा नदीवर जवळपास ३० वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला होता. परंतु, अलीकडच्या काळात हा बंधारा वाहतुकीसाठी कमकुवत ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी या पुलाच्या भराव्याचा काही भाग ढासळला होता. भामनेर खोरे जोडण्यासाठी हा महत्त्वाचा पूल आहे. एमआयडीसी भागात ये- जा करण्यासाठी कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. तसेच, शेलू येथील असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा देखील अवजड वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे पुढील काळात या दोन्ही बंधाऱ्यावरून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अवजड वाहतूक करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
हे दोन्ही पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांना आता तळशेत ते धामणे या दरम्यान असणारा पूल किंवा पुणे- नाशिक मार्ग असा प्रवास करावा लागणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून, वेळ आणि इंधनाचा यामुळे मोठा अपव्यय होणार आहे.
याबाबत तहसीलदार कार्यालय आणि संबंधित पोलिस ठाण्याला याबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही बंधाऱ्यावरून दुचाकी तसेच हलकी वाहने प्रवास करू शकतात, असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) आश्विन पवार, शाखा अभियंता शुभम सुसुंद्रे, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

तत्काळ दुरुस्ती करावी
हे पूल बंद केल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ या मार्गांना पर्यायी पूल म्हणून मोठे आणि रुंद पूल उभारण्याची गरज आहे. विशेषतः कोरेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. किमान हा पूल तरी तत्काळ दुरुस्त करून अधिक रुंद करावा, अशी मागणी वाहनचालक, नागरिक करीत आहेत.

03520

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT