आंबेठाण, ता. २० : बोरदरा (ता. खेड) येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत सय्यद इनामदार स्पोर्टस् फाउंडेशन या संघाने प्रथम क्रमांक मिळवत श्री ज्योतिर्लिंग चषक २०२६ पटकावला. किरण पडवळ स्पोर्टस् फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धेत खेड, हवेली, मावळ, बारामती आदी भागांतून २५ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज म्हणून कोये संघाच्या विक्रम रौंधळ यांना तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून कोये संघाच्या पप्पू कांडेकर यांना गौरवण्यात आले. या स्पर्धेदरम्यान माजी सभापती भगवान पोखरकर, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी पडवळ, अमोल पडवळ, सचिन पडवळ, तुषार आरु, विशाल पवार आदींनी भेटी दिल्या.
ही क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्तिक पडवळ, ऋषिकेश पडवळ, आदेश पडवळ, संकेत पडवळ, स्वप्निल पडवळ, महेश पोखरकर, साहिल गायकवाड, निखिल गायकवाड, रतनदीप ठोके, सोमा पवार, अविनाश काळे, अजय काळे आदींनी प्रयत्न केले. सुरेश घनवट, कैलास निखाडे, संदीप पडवळ, विशाल पडवळ, हर्षद पडवळ यांनीही विविध प्रकारे स्पर्धेसाठी मदत केली.
विजेते संघ पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक - सय्यद इनामदार स्पोर्ट फाउंडेशन, बुट्टेवाडी.
द्वितीय क्रमांक - जीवन खराबी स्पोर्ट फाउंडेशन, चाकण.
तृतीय क्रमांक - मंगेश सावंत स्पोर्ट फाउंडेशन, शिरोली.
चतुर्थ क्रमांक - सुनीता शरद बुट्टेपाटील स्पोर्ट फाउंडेशन, कोये.
पंचम क्रमांक - पप्पू टोपे स्पोर्ट फाउंडेशन, वाकी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.