पुणे

वहागाव येथे गरजूंना कपडे वाटप

CD

आंबेठाण, ता. २३ : वहागाव (ता. खेड) येथील आदिवासी वस्ती असणाऱ्या ठाकरवाडीमधील गरजू नागरिकांना माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
राजगुरुनगर (ता. खेड) येथील माऊली सेवा प्रतिष्ठान हे नागरिकांकडून लहानांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत जुने परंतु वापरण्यायोग्य असलेले कपडे गोळा करते. त्या कपड्यांची अंदाजे वय आणि साईजनुसार विभागणी करून ते कपडे जिथे गरज असेल तिथे वाटप केले जातात. प्रतिष्ठानने गेल्या एक महिन्यात जमा झालेल्या २० पोती कपड्यांचे वाटप खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या वहागावच्या ठाकरवाडीत गरजू नागरिकांना केले आहे. गरजूंना कपडे मिळाल्यानंतर आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, अविनाश पाटील, जनार्दन बुट्टे, सविता लोंढे यांनी कपडे वाटपाचे नियोजन पार पाडले. यावेळी सत्यवान नवले, कैलास नवले, सुभाष नवले, दीपक नवले, शाखा प्रमुख संतोष नवले, गणेश नवले, सुदाम पवार, किसन पवार, बाळासाहेब देशमुख, अंकुश जाधव आदी उपस्थित होते.

03532

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India EU FTA : खुशखबर ! कार्सच्या किमती आणखी कमी होणार; भारताच्या 'या' डील नंतर कार खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री! ‘लग्नाचा शॉट’मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Crime: धक्कादायक! समलिंगी संबंध ठेवण्यास विद्यार्थिनीचा नकार; आत्यानं रुद्राक्षाच्या माळांनी गळा दाबून संपवलं

Latest Marathi news Update : शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच रायगडमधील राजकारणावर मोठ वक्तव्य

Bank Closed : सलग चार दिवस बँका बंद! 27 जानेवारीला बँकिंग सेवा का बंद राहणार? बँकेत जाण्याआधी जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT