आंबेठाण, ता. १० : जिल्हा परिषद निवडणुकीत खेड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जरी घवघवीत यश मिळाले असले, तरी आंबेठाण- पाईट जिल्हा परिषद गटात आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद यांचा मात्र पराभव झाला. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच सदस्य जिंकून गड जिंकला, परंतु बहिणीचा पराभव झाल्याने सिंह गेला, अशी अवस्था झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्यपदासाठी आंबेठाण- पाईट जिल्हा परिषद गटात मोठी चुरस पाहायला मिळाली. सलग चार वेळा या जिल्हा परिषद गटावर वर्चस्व ठेवलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता आणि खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद, तसेच माजी आमदार सुरेश गोरे यांच्या चुलत भावजय निशा गोरे यांच्यात लढत झाली. लढत तिरंगी झाली तरी प्रमुख लढत बुट्टे पाटील आणि जैद यांच्यात झाली. त्यात सुनीता बुट्टे पाटील यांना १५ हजार ८८३ मते, तर राजश्री जैद यांना १५ हजार ४८२ एवढी मते पडली. निशा राहुल गोरे यांना अवघी ८३२ मते पडली. यात बुट्टे पाटील या ४०१ मतांनी विजयी झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.