पुणे

करंजविहिरेत उपाययोजनांचा अभाव

CD

रूपेश बुट्टेपाटील ः सकाळ वृत्तसेवा
आंबेठाण, ता. १४ : करंजविहिरे (ता. खेड) येथे नवलाख उंबरे रस्त्यावर असणाऱ्या खेंगले वस्ती परिसरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत धोकादायक विहीर आहे. नव्यानेच या विहिरीचे काम करण्यात आले असून, रस्त्याच्या उंचीपेक्षा विहिरीच्या कठड्याची उंची कमी असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
करंजविहिरे ते नवलाख उंबरे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

संरक्षणात्मक उपाययोजनांचा अभाव
चेतावणी फलक नाही
परावर्तक नाही
उंच कठडे नाहीत
संरक्षण जाळी नाही
लाइटची व्यवस्था नाही

मला पाहिल्याशिवाय नक्की जागेवरची परिस्थिती सांगता येणार नाही. मी पाहणी करते किंवा आमच्या अभियंत्याला सांगून पाहणी करायला सांगते.
- भाग्यश्री गिरी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

या मार्गाने तळेगाव दाभाडे, पिंपरी, चिंचवड, मुंबई या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. याशिवाय एमआयडीसीत रोजंदारीसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही जास्त आहे. रस्ता प्रशस्त आणि चांगला झाल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. अशावेळी कुठलीही पूर्वसूचना न दिलेली किंवा सूचना फलक नसलेली विहीर जीवघेणी ठरू शकते. या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- संतोष पडवळ, प्रवासी

03596

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Airstrike Iran : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला धुडकावून इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला

Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

SCROLL FOR NEXT