आंधळगाव, ता. २८ : ‘‘चासकमान व घोड धरणाच्या पाण्याबाबत योग्य नियोजन केले असल्याने शेतकऱ्यांना गरजेनुसार पुढील आवर्तन उपलब्ध करून दिले जाईल. चासकमान धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा पाणीटंचाईची अडचण येणार नाही,’’ अशी ग्वाही आमदार अशोक पवार यांनी दिली.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, कोळगाव डोळस, मांडवगण फराटा येथे विविध रस्त्यांचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी (ता. २६) झाला. त्यावेळी आमदार पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, संभाजी फराटे, दत्तात्रेय फराटे, सरपंच मनीषा जाधव, सरपंच उषा जगताप, किरण शितोळे, काका मोहिते, हनुमंत तांबे, शहाजी फराटे, विष्णुपंत वाबळे, रामदास काळे, विकास वाबळे, शीतल चव्हाण, रामचंद्र केदारी, सतीश चव्हाण, सागर गराडे, सिद्धार्थ डोळस, सखाराम गोरे, विलास जगताप, परसराम पडवळ, बाबू गोरे आदी उपस्थित होते.
या वेळी विश्वास ढमढेरे म्हणाले, ‘‘शिरूर तालुक्यात आमदार पवार यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. विकासकामे करताना कधीही भेदभाव केला नाही. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा आमदार तालुक्याला लाभला आहे. शेतीच्या पाण्याच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करावा लागतोय. येत्या काळात उर्वरित विकासकामे करण्याला प्राधान्य दिले जाईल.’’
मतदारसंघात विकासकामांचा आलेख पाहता रस्त्यांच्या कामांना नेहमी प्राधान्य दिले आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. निकृष्ट दर्जाची कामे होत असतील; तर नागरिकांनी ती त्वरित थांबवावीत.
- अशोक पवार, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.