आंधळगाव, ता.२८ : नागरगाव, रांजणगाव सांडस, आंधळगाव या गावात आठवडाभरात तब्बल ५ विद्युत रोहित्रांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी विद्युत रोहित्र चोरीचा सपाटा लावला आहे. रांजणगाव सांडस येथून गुरुवारी पहाटे (ता.२४)येथून दोन, शुक्रवारी (ता. २५) पहाटे दोन, नागरगाव येथून मंगळवारी (ता.२८) एक रोहित्र चोरी गेले आहे.
विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या महागड्या कॉईल्स काढून त्याची विक्री होत आहे. रोहित्र चोरीला जात असल्यामुळे गाव तसेच शेतीचा पाणीपुरवठा ठप्प होत आहे. पाऊस नसल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून पिकवलेल्या मालाला बाजारभाव नाही. या समस्यांना सामोरे जात असताना रोहित्र चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. परिसरात विद्युत रोहित चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच पूर्व भागात विद्युत रोहित्र, केबल, विद्युत मोटार चोरण्याचा धुमाकूळ चोरट्यांनी घातला आहे. शिरूर पोलिसांनी या चोरट्याचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे. विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये म्हणून रोहित्राला महावितरण विभागाच्या वतीने वेल्डिंग करण्यात येत आहे.परंतु आता चक्क चोरटे वेल्डिंग तोडून विद्युत रोहित्र चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
00433
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.