पुणे

मांडवगण येथे हिवतापाविषयी जागृती

CD

आंधळगाव, ता. २५ : राष्ट्रीय हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. नितीन फटाले यांनी केले आहे.

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन जनजागृतीपर व्याख्यान, प्रभातफेरी, सामूहिक किटकशास्त्रीय सर्वेक्षण आदी उपक्रमांनी साजरा केला. यावेळी फटाले बोलत होते.

वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन फटाले व आरोग्य सहाय्यक शिवाजी सांगळे यांनी हिवतापाविषयी जनजागृतीपर व्याख्यान दिले. कोरडा दिवस पाळण्याचे महत्त्व, हिवतापापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजना, आजार झाल्यास घ्यावयाची काळजी आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी हिवताप जनजागृतीसाठी गावामध्ये फेरी काढून ‘गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा’, डंक छोटा, धोका मोठा इत्यादी घोषणा दिल्या. राजेंद्र काळे, सुहास डोईफोडे, विकास करपे, शहाजी नागवे, श्रीरंग कापसे, अनिल काटाले, गटप्रवर्तक मनिषा कुदळे, धनश्री हांडे व आशा स्वयंसेविका यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदलणार; 'या' भागांत 'अवकाळी'ची शक्यता; जाणून घ्या २६ ते २९ ऑक्टोबरचा अंदाज

Devendra Fadnavis: तिसरी मुंबई ठरेल ‘ग्रोथ इंजिन’:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नैना’त १५ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Pune Weather News: पुणेकरांनो, उन्हाचा चटका वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

Anti American Bias: अमेरिकाविरोधाचा पूर्वग्रह

Shepu Dhapata: ज्वारीच्या पिठापासून बनवा कुरकुरीत शेपूचा धपाटा; चव इतकी भारी की पुन्हा पुन्हा खाल!

SCROLL FOR NEXT