पुणे

घोडगंगा कारखान्यातील भंगार वस्तूंना आग

CD

आंधळगाव, ता. २ : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारात पडून असलेले प्लॅस्टिकचे रासायनिक टाकाऊ केमिकल बॅलर आदी भंगार वस्तूंना गुरुवारी (ता. २) दुपारी अचानक आग लागली. रासायनिक टाकाऊ केमिकल बॅलर जळाल्याने कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आग वेळीच आटोक्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शिरूर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तसेच पीएमआरडीएचे वाघोली अग्निशमन दल, रांजणगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आटोकाट प्रयत्न केले.

न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या परिसरात भंगार साहित्य टाकण्यात आले आहे. कारखान्याच्या साखरेच्या गोडाऊनच्या लगत रासायनिक प्लॅस्टिकचे बॅलर आदी भंगार वस्तूंचा टाकाऊ मोठ्या प्रमाणात ढीग होता. त्यामधूनच भर दुपारी चारच्या सुमारास आगीचे मोठ्या प्रमाणात लोळ तसेच धूर दिसत असल्याने घटनास्थळी कामगारांनी धाव घेतली. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने आमदार अशोक पवार यांनी तातडीने प्रसंगावधान राखून हजर राहून अग्निशमन दलाला बोलावून घेत उपस्थित कामगार, कार्यकर्ते व अग्निशमन दलाचे पथक यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. युद्ध पातळीवर काम करत दोन तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले. वातावरणातील कडक उष्णता यामुळेच केमिकल मिश्रित बॅलरला व भंगार वस्तूंना ही आग लागल्याने कारखान्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी सांगितले.

यावेळी घटनास्थळी आमदार अशोक पवार, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, विश्वास ढमढेरे, राजेंद्र कोरेकर, सुधीर फराटे, कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, मानसिंग कोरेकर, बीरा शेंडगे, नरेंद्र माने, उत्तम सोनवणे, स्वप्नील गायकवाड, दत्तात्रेय फराटे, गौतम कदम, सागर राजेनिंबाळकर, राहूल करपे, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, कारखान्याचे
अधिकारी, कामगार, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT