पुणे

आंधळगाव-तांदळी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली

CD

आंधळगाव, ता. ३ : आंधळगाव-तांदळी या जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली होती. सोमवारी (ता. ८) ‘सकाळ’ ने या रस्त्यावरील काटेरी झुडपांच्या समस्येचे वृत्त ‘आंधळगाव- तांदळी रस्त्यावर काटेरी झुडपांचा अडथळा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने जेसीबीने काटेरी झुडपे काढली. यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
दीड वर्षांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून काटेरी झुडपे रस्त्यावर येऊन ठेपली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिरूर उपविभागाने ठेकेदाराला काटेरी झुडपे काढण्यास भाग पाडले. आंधळगाव ते तांदळीपर्यंत काटेरी झुडपे काढली. या रस्त्यावरील वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे प्रवास धोक्याचा ठरत होता. रस्त्यावर वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते. काटेरी झुडपे काढल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

आंधळगाव-तांदळी रस्त्यावरील काटेरी झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. संबंधित ठेकेदाराला आदेश दिल्याने काटेरी झुडपे काढली आहेत.
- रणजित धाईगडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिरूर.

गेल्या सहा महिन्यांपासून आंधळगाव तांदळी रस्त्यावर काटेरी झुडपांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होते. ‘सकाळ’ ची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्वरित काटेरी झुडपे काढली. आम्ही ‘सकाळ’ चे मनापासून आभार मानतो.
- लताबाई कुसेकर, सरपंच, आंधळगाव (ता. शिरूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT