पुणे

घरासमोर बांधलेली शेळी बिबट्या ओढत गेला घेऊन

CD

आंधळगाव, ता. १ : इनामगाव (ता. शिरूर) येथील दर्यापट येथील शेतकरी यशवंत पोपट शिंदे यांची शेळी शनिवारी (ता. २९) दुपारी चार वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाली.
शिंदे यांनी नेहमीप्रमाणे शेळी घरासमोरील पटांगणात बांधली होती. यावेळी घराशेजारी असणाऱ्या हत्तीगवताच्या शेतातून बिबट्या बाहेर आला व घरासमोर असणाऱ्या शेळीवर त्याने हल्ला केला. यावेळी शिंदे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी बिबट्याने शेळीला पकडल्याचे पाहताच आरडाओरडा सुरु केला. मात्र बिबट्याने कुणालाही न जुमानता शेळीला ओढत हत्ती गवताच्या शेतात नेले.
दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्याची माहिती शिंदे यांनी वनविभागाला दिली. या घटनेचा वनमजूर नवनाथ गांधले यांनी पंचनामा केला. पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची परिसरातील ही नववी ते दहावी घटना असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या महिन्यात येथील अंकुश सुदाम ठाकरे या बारा वर्षाच्या चिमुकल्याने हल्ला केला होता. या परिसरात बिबट्याचे नागरिकांना सातत्याने दर्शन होत आहे. परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून, पाळीव प्राण्यांवर हल्लासत्र सुरु असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT