पुणे

वडगाव रासाई येथे बिबट्या जेरबंद

CD

आंधळगाव, ता. ६ : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील सगनाई वस्ती परिसरातील ज्ञानदेव शितोळे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (ता. ६) सकाळच्या सुमारास नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या पकडल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील अशोक भाऊसाहेब चव्हाण यांच्या दोन कालवडीचा बिबट्याने मागील महिन्यात फडशा पाडला होता. यामुळे वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार व स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने शेलारवाडी व सगनाई वस्ती येथे दोन पिंजरे लावले होते. त्यातील शेलारवाडी येथे २६ नोव्हेंबरला एक बिबट्या यापूर्वी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र सगनाई परिसरात शुक्रवारी (ता. ६) सकाळी भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. काही अंतरावर असलेले रेस्क्यू पथक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याच्या ठिकाणी धाव घेत त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले.
जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, विशाल चव्हाण, शेखर जानगवळी, गणेश डोईफोडे, गोविंद शेलार, सुधीर शितोळे, शरीफ शेख, शरद गदादे, मनोज चौधरी, अमोल पाटोळे, सुनील कळसकर, रोहिदास शेंडगे, विशाल मोरे, संदीप गव्हाणे, राहुल अवचिते, पिंपरखेड बेस कॅम्प टीम सदस्य आदींनी हे कार्य केले आहे. दरम्यान, वडगाव रासाई परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे वनविभागाने या ठिकाणी असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवावी, अशी मागणी सरपंच शेलार व नागरिकांनी केली आहे.

मांडवगण येथे बिबट्याच्या हल्ल्यातील दोन्ही मृत चिमुकल्यांचे स्वॅप घेतले आहेत. जेरबंद केलेल्या दोन्ही बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविले आहे. दोन्ही बिबट्यांना बेशुद्ध करून त्यांच्या लाळेचे नमुने हैदराबाद येथील न्यायवैद्यक संस्थेच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जातील. तपासणी केल्यानंतर हे दोन्ही बिबटे नरभक्षक आहेत की, नाही हे स्पष्ट होईल. या परिसरातील पिंजरे अजूनही काही परिसरात ठेवणार आहोत. या परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी स्वतःची काळजी घ्यावी.
-संतोष कंक, प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी (ता. शिरूर)

वडगाव रासाई हद्दीत वनविभागाने दोन बिबट जेरबंद केले. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. मात्र मांडवगण फराटा परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्त्यव्य आहे. त्यामुळे वनविभागाने येथील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा. या परिसरातील बिबटे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत येथील पिंजरे अन्य दुसरीकडे हलवू नये.
-सुधीर फराटे, माजी संचालक, घोडगंगा कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT